Home बातम्या आंतरराष्ट्रीय जगातील सर्वात घातक शक्तीशाली हेलिकॉप्टर; वैशिष्ट वाचूनव्हाल थक्क

जगातील सर्वात घातक शक्तीशाली हेलिकॉप्टर; वैशिष्ट वाचूनव्हाल थक्क

0

जगातील सर्वात घातक शक्तीशाली हेलिकॉप्टर; वैशिष्ट वाचूनव्हाल थक्क

भूषण गरुड
जगातील सर्वात घातक हेलिकॉप्टरची चर्चा तेव्हा सर्वात पहिले अमेरिकेच्या अपाचे हेलिकॉप्टरचे नाव समोर येते. हे शक्तीशाली हेलिकॉप्टर मंगळवारी भारतीय हवाईदलात अधिकृतरित्या सामील झाले. भारतीय हवाईदलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी आपल्या निवृत्तीपूर्वी पठाणकोट हवाईतळावर हे हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलात सामील करून घेतले.
अपाचे हेलिकॉप्टर तीस वर्षे जुने MI 35 ची जागा घेणार आहे. ग्रुप कॅप्टन एम शयलु पहिल्या अपाचेची लगाम सांभाळणार आहेत. शयलु यापूर्वी कार निकोबार येथील एमआय -17 व्ही 5 हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी अपाचे हेलिकॉप्टरचे पूर्णपणे प्रशिक्षण घेतलेले आहे. अपाचे हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलात सामील झाल्यामुळे आता शत्रुला घरात घुसुन मारण्याची भारताची ताकद आणखी वाढणार आहे.
हेलिकॉप्टरमध्ये असलेले शस्त्रे ही कोणत्याही अॅटॅक हेलिकॉप्टरची ताकद असते. दोन आसनी अपाचे हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर मिसाइल्स आणि दोन्ही बाजूने 30mm ची दोन बंदुक आहेत.
या हेलिकॉप्टरचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे दिवसाप्रमाणे रात्री देखील उत्तप प्रकारे काम करु शकते.
या हेलिकॉप्टरमध्ये एक सेंसर बसवण्यात आलेले आहे जे रात्रीच्या वेळी मोहीम फत्ते करण्यासाठी मदत करेल.
अपाचे 293 किमी प्रति तास वेगाने उड्डाण करु शकते आणि शत्रुच्या भागाता जाऊन आपल्या लक्ष्याला सहजरित्या उद्ध्वस्त करु शकते.