सांगलीच्या जत तालुक्यात आज पासून जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे जत शहरात विनाकारण आणि मोकाट फिरणाऱ्यांची अँटीजन टेस्ट केली जात आहे. तर शहरात मोकाट फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद पोलिसांनी दिला जात आहे. तर सांगली मध्ये उद्या पासून जनता कर्फ्यू असल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकनांवर कारवाईला सुरवात केली आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गोडम यांनी दिला आहे..
- Advertisement -