Home शहरे जळगाव जनतेची गैरसोय खपवून घेणार नाही, खासदार उन्मेश पाटलांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

जनतेची गैरसोय खपवून घेणार नाही, खासदार उन्मेश पाटलांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

0

 भडगाव : गेल्या अनेक दिवसापासून सेंट्रल बँकेच्या कजगाव (ता.भडगाव )शाखेत इंटरनेट सह अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागत होता. या अडचणी खासदार उन्मेश पाटील यांचेकडे फोन वरून नागरीकांनी मांडल्या. खासदार उन्मेश पाटील यांनी सरळ बँकेच्या कजगाव शाखेत नागरिकांसह धडक देत व्यवस्थापक कसबे यांना जाब विचारला. अनेक दिवसांपासून ग्राहकांना सात्यत्याने इंटरनेटसेवा, मुद्रा लोन आणि सेवा सुविधेबाबत माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. उद्याच्या उद्या सर्व अडचणी दूर करा अन्यथा आपणांस नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागेल असा दम भरला. सेंट्रल बँक महाव्यवस्थापक यांचेशी दूरध्वनी वर चर्चा करून लवकरात लवकर खातेदारांची अडचण दूर करावी, मुद्रा लोन संदर्भात तरुणाच्या अडचणी दूर कराव्यात जवळपासच्या चाळीस खेड्यातील मोठ्या प्रमाणात जेष्ठ ठेवीदार असतांना त्यांच्या अडचणीत दररोज वाढ होत असताना, आपण आपली जबाबदारी पार पाडावी अन्यथा नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागेल. असा इशारा दिला. याप्रसंगी नागरिकांनी देखील खासदार उन्मेश पाटील यांच्या समोर मॅनेजर कसबे यांचेवर प्रश्नाची सरबत्ती केली.

उन्मेश पाटलांच्या धडाडीचे कजगाव परिसरात कौतुक

आमच्या अडचणी दूर करण्यासाठी थेट खासदार उन्मेश पाटील यांनी बँकेत धडक दिली. याचं उपस्थित सर्वच ग्राहकांनी फार कौतुक केले. जेष्ठ नागरिकांनी उन्मेश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आमच्या अडचणी दूर केल्या बद्दल धन्यवाद दिले. यावेळी शेकडो नागरिकांनी खासदार उन्मेश यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.