लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जबरी चोरी करणारे २ सराईत गुन्हेगार लोणीकंद पोलीस स्टेशन कडून जेरबंद;
परवेज शेख लोणीकंद : दिनांक (७ फेब्रु) रोजी फिर्यादी पंकज कुमार त्रिभुवन प्रजापती (वय २४ ) हे सायं. ७ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील महाराष्ट्र बँकेचे समोरून लोणीकंद माथा येथे पायी चालत जात असताना लोणीकंद बाजूकडून मोटर सायकलवर आलेल्या 3 अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना थांबवून त्यातील दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादीचे डोक्यात दगडाने मारून दुखापत केली व फिर्यादी यांच्या खिशातील 12,000 रुपये रोख रक्कम व रेडमी कंपनीचा मोबाइल हँडसेट व एक जिओ कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून मोटरसायकलवरून पळून गेले.
याप्रकरणी फिर्यादी यांच्या सांगण्यावरून लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा.पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे आदेशावरून रेकॉर्डवरील आरोपी यांचा हद्दीमध्ये शोध घेत असताना आज दिनांक 11/2/2020 रोजी वरील गुन्हा हा तुषार रखमाजी पवार (वय 19) राहणार पिंपळनेर ता. पारनेर जि. अहमदनगर
राजू विजय तुपे (वय 22) रा.आवटेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर व त्यांचा साथीदार यांचे मदतीने केला असल्याचे समजल्याने सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी तुषार रखमाजी पवार याच्यावर यापूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे १ तर रांजणगाव पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या प्रकारचे २ असे एकूण ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासादरम्यान पोलिसांना मिळाली.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय गुंड व त्यांच्या पथकाने केली आहे.






















WhatsApp