Home गुन्हा जबरी चोरी करणारे २ सराईत हिंजवडी पोलिसांकडून जेरबंद

जबरी चोरी करणारे २ सराईत हिंजवडी पोलिसांकडून जेरबंद

0


पुणे- परवेज शेख

हिंजवडी परिसरात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बेंगलोर मुंबई महामार्गावरील भुमकर चौकात करण्यात आली. सतिश साहेबराव सावंत (वय-३० रा. थेरगाव) आणि विकास संभाजी तनपुरे (वय-२० रा. गणेश कॉलनी, थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तीन महिन्यापूर्वी आरोपींनी पहाटे दीडच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला खाली पाडून त्याच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्ह्यातील आरोपी वाकड येथील भुमकर चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सापळा रचून अटक केली. आरोपींनी चौकशी दरम्यान तीन महिन्यापूर्वी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विकास तनपुरे याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले असून तडीपार असताना देखील तो शहरात वावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस आयुक्त पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधिर हिरेमठ, विनायक ढाकमे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय जोगदंड तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनुरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे, सहायक फौजदार महेश वायबसे, बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, आतिक शेख, कुणल शिंदे, विवेक गायकवाड, हणुमंत कुंभार, सुभाष गुरव, विकी कदम, चंद्रकांत गडदे, आकाश पांढरे, श्रीकांत चव्हाण, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, अली शेख, रितेश कोळी यांच्या पथकाने केली