जय महाराष्ट्र कार्यक्रमात उद्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांची विशेष मुलाखत

जय महाराष्ट्र कार्यक्रमात उद्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांची विशेष मुलाखत
- Advertisement -

मुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार दि. २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPRA

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, विश्वकोश निर्मितीची प्रक्रिया, आतापर्यंत प्रकाशित झालेले खंड, लहान मुलांसाठीचा विश्वकोश, विश्वकोश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मंडळामार्फत केले जात असलेले प्रयत्न आदि विषयांची सविस्तर माहिती डॉ.राजा दीक्षित यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.

00000

- Advertisement -