Home ताज्या बातम्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ८ मार्च रोजी मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ८ मार्च रोजी मुलाखत

0
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ८ मार्च रोजी मुलाखत

मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत बुधवार, दि. 8 मार्च 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक-  https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

दरवर्षी जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने महिला धोरण अधिक मजबूत होण्यासाठी घेतलेला पुढाकार, शासनाच्यावतीने आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीचा पाठपुरावा डॉ. गोऱ्हे यांनी केलेला आहे. त्यासाठी राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून कसे संरक्षण देता येईल, यासाठी त्यांचे सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत.

समाजात घडत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याशी मुक्त संवाद करणे, समाजाने संयम व समजदारीची भूमिका घेणे, महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अशा विविध विषयांवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सविस्तर संवाद साधला आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

सागरकुमार कांबळे/स.सं