मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. रविवार, दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब- https://www.youtube.co/
फेसबुक https://www.facebook.com/
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ आणि सेवा पंधरवडा याविषयी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतीमान, कालबद्ध सेवा देण्यासाठी ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ पारित करण्यात आला आहे. नागरिकांना अधिकार देणारा आणि प्रशासनाला उत्तरदायी करणारा हा क्रांतिकारी कायदा आहे, असे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी सांगितले आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
०००