‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या जे.जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या जे.जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत
- Advertisement -

मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 17 नोव्हेंबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

मुंबई, भिवंडी, मालेगाव (जि. नाशिक) परिसरात गोवरचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. या उपाययोजनांची माहिती, रोगाची लक्षणे, रोग होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, लसीकरण अशा विविध विषयांवर जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी विस्तृत माहिती ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

- Advertisement -