मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्याच्या यादीत पहिली आलेल्या प्रियंवदा म्हाडदळकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहाय्यक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरुवार, दि. 21 जुलै 2022 रोजी रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/
फेसबुक – https://www.facebook.com/
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विशेषतः गुणांच्या यादीत मुलींचा क्रमांक वरचा लागत आहे. सामाजिक सुधारणांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातून पहिली येण्याचा मानही एका मुलीला मिळाला असून प्रियंवदा म्हाडदळकर यांनी परीक्षेची तयारी कशी केली याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.
000