Home बातम्या राष्ट्रीय ‘जय श्री राम’चा नारा मिठी मारून म्हणता येईल, गळा दाबून नाही : मुख्तार अब्बास नक्वी

‘जय श्री राम’चा नारा मिठी मारून म्हणता येईल, गळा दाबून नाही : मुख्तार अब्बास नक्वी

नवी दिल्ली : झारखंडमध्ये जमावाद्वारे युवकाची मारहाण करून हत्या करण्यात आल्यावरून केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हा घोर अपराध असल्याचे म्हटले आहे. लोकांकडून जय श्री रामचा नारा हा गळ्यात गळे घालून म्हटला जाऊ शकतो, कोणाचा गळा दाबून किंवा चिरून नाही, असे नक्वी यांनी सांगितले. या प्रकरणात जे लोक सहभागी असतील त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


जारखंडच्या सरायकेलामध्ये बाईक चोरी करण्याच्या संशयातून जमावाने तरबेज नावाच्या युवकाला खांबाला बांधून मारहाण केली होती. यानंतर तरबेजचा तुरुंगात मृत्यू झाला. पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले आहे की, त्याच्याकडून जय श्री रामचे नारे वदवून घेतले होते. पोलिसांनी बेजबाबदारपणा दाखवत त्याला उपचारांशिवाय तुरुंगात पाठविल्याचा आरोप करण्यात येत आहे.  नक्वी यांनी सांगितले की, यंदा दोन लाख भारतीय मुस्लिमांना कोणत्याही सबसिडीशिवाय हज यात्रेला पाठविण्यात येणार आहे. सरकारच्या चांगल्या हेतूमुळे आणि पारदर्शक कारभारामुळे सबसिडीशिवायही हज यात्रेकरूंवर जादा बोजा पडलेला नाही. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने हज यात्रेकरू जाणार आहेत. सब्सिडीच्या छऴाला मोदी सरकारने चांगल्या हेतूने बंद केले आहे.