Home शहरे जळगाव जळगावात एकूण रुग्णांची संख्या 279 ,नवे 13 कोरोनाग्रस्त

जळगावात एकूण रुग्णांची संख्या 279 ,नवे 13 कोरोनाग्रस्त

जळगाव : जळगावातील कोरोनाग्रस्तांची संख्याही सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यात तेरा कोरोना बाधित नविन रूग्ण आढळले आहेत. आता शहरातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 279 झाली आहे.भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यामधील 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 13 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 279 वर पोहोचली आहे.