Home शहरे जळगाव जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं

जळगाव :- राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मंगळवारी ११६ तर बुधवारी ११४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता गुरूवारी पुन्हा एका दिवसात तब्बल १३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील २०, जळगाव ग्रामीण ०५, भुसावळ ०५, अमळनेर ०३, चोपडा ०५, पाचोरा ०३, भडगाव ०२, धरणगाव २२, यावल ०२, एरंडोल ०१, जामनेर १८, रावेर २१, पारोळा ०९, बोदवड ०४ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५२६ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.