Home गुन्हा जळगाव डीवायएसपी डॉ नीलाभ रोहन यांची धडाकेबाज कारवाई ;हाय प्रोफाइल कुंटनखान्यावर छापा

जळगाव डीवायएसपी डॉ नीलाभ रोहन यांची धडाकेबाज कारवाई ;हाय प्रोफाइल कुंटनखान्यावर छापा

जळगाव प्रतिनिधी :- जितेंद्र चौधरी

जळगाव शहरातील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील खेडी गावा जवळ ज्ञानचेतना अपार्टमेंट वर डी वाय एस पी डॉक्टर निलाभ रोहन यांच्या पथकाने छापा टाकला. या इमारतीत हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील खेडी खुर्द गावाजवळ ज्ञानचेतना अपार्टमेंट याठिकाणी हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवला जात असल्याची गुप्तमाहिती डी वाय एस पी डॉ निलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम, एमआयडीसी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे व गुन्हे शाखेचे पथक, एमआयडीसी पोलीस कर्मचारी अशा संयुक्त पथकाने आज रात्री आठ वाजेच्या सुमारास ज्ञानचेतना अपार्टमेंट वर छापा टाकला. याठिकाणी आंबट शौकीनाकडून कुंटणखाना चालवत असल्याचे पोलीस पथकाला निदर्शनास आले आहे.

पंटर ने इशारा देताच मिळालेल्या गुप्त माहितीचा पाठलाग करत पोलीस पथकाने ज्ञानचेतना अपार्टमेंटमध्ये कारवाई करण्यापूर्वी नियोजित कुंटणखाना संबंधित दलाला फोन करायला लावले. सौदा ठरल्यावर पैसे दिल्यानंतर पंटर रूममध्ये जाताच त्याने मिस कॉल देत पोलिसांना सिग्नल दिला. काही वेळातच पोलिसांचा ताफा अपार्टमेंटमध्ये शिरला. चार महिलांसह एक पुरुष दलाल पोलिसांनी अटक केली असून रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यामध्ये मुलगा व आईसह दोन महिला व दोन महाविद्यालयीन युवतींना अटक करण्यात आली आहे. ।।