जळगाव पोलीस महेंद्र अहिरराव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

- Advertisement -

जळगाव – प्रतिनिधी (जितेंद्र चौधरी )कोरोना विषाणूच्या पाश्वभूमीवर अनेक समाजसेवी संघटना तसेच शाशकीय यंत्रणा आप आपल्या परीने मदत करीत आहेत. त्यातच आपल्या गावाच्या आणि शहराच्या माणसासाठी मूळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी आणि जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस काँस्टेबल महेंद्र अहिरराव यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिलमध्ये दाखल असलेल्या अमळनेरातील रुग्णांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. म्हणूनच या वर्दीतील योद्धा च्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कोरोना महामारीमुळे अमळनेर शहारातील व तांबेपुरा सानेनगर न्यू प्लॉट परिसरातील रुग्ण जळगाव येथील कोविड रुग्णालयात दाखल आहे. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत असल्यास महेंद्र अहिरराव यांना कॉल केला तर ते स्वतः जिवाची पर्वा न कर्ता कोरोनाग्रस्थ नातेवाईकांची अडचण सोडवण्यासाठी कोविड रुग्णालयात जातात. तेथे डॉक्टरांशी बोलून उपचार तसेच दाखल रुग्णांच्या जेवनाची सोय आणि अंत्यविधीसाठी येणाऱ्या अडचणीही सोडवत आहेत. यासाठी ते लाकडाची व बोळाणचीही सोय करून देत आहेत. ऐवढेच नव्हेत तर सॅनिटायझर , पिपीए कीटही उपलब्ध करून देत आहेत. या वर्दीतील योद्धा चे तांबेपुरा व साने नगर न्यू प्लॉट परिसरातून सर्वत्र कौतुक केले जात आहे .त्यांच्या या नि :स्वार्थ सेवेबद्दल दर्शन पोलीस टाइम वेब पोर्टल तर्फे शुभेच्छा .

- Advertisement -