जव्हार मध्ये तरुण – तरुणीची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या …

- Advertisement -

पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आयरे बीजपाडा जंगलात काल एका झाडाला नायलॉनच्या एकाच दोरीला तरुण – तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत सविस्तर वृत असे की, विक्रमगड तालुक्यातील सारशी मागीपाडा गावातील रामू बाळु खानजोडे वय 20 वर्षे याचा जव्हार मधील आयरे गेटीपाडा मधील मनीषा पांडू भावर वय 18 वर्षे यांचा मागील वर्षी साखरपुडा झाला होता.यावर्षी लग्न होणार होते. मात्र मुलाच्या घरच्या लोकांचा या लग्नाला विरोध होता.परंतु मुलाला याच मुलीसोबत विवाह करायचा होता असे मुलीच्या भावाने तक्रारीत संगितले आहे. मनीषा ही दोन दिवसापूर्वी आपल्या मोठ्या बहिणीच्या जव्हार मधील जोघारी चोडीचा पाडा येथे पाहुण्याकडे जाते अशी सांगून घरातून निघून गेली. मात्र काल त्यांनी जव्हार मधील आयरे जंगलात एका झाडाला एकाच नायलॉनच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर चे वृत समजता जव्हार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढिल तपास पोलीस अधिकारी सूरळकर करत आहेत.

- Advertisement -