Home शहरे अकोला जागतिक महिला दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत

जागतिक महिला दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत

0
जागतिक महिला दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 7 : जागतिक महिला दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि.8 मार्च, बुधवार दि.9 मार्च व गुरूवार दि. 10 मार्च 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

नवीन  महिला धोरण कसे असेल, महिला व बालकांची सुरक्षितता, महिला सक्षमीकरण व त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ३ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय, कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांना दिलेला दिलासा, मिशन वात्सल्य आदी विषयांची सविस्तर माहिती, श्रीमती यशोमती ठाकूर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.

00000