जातीय तेढ निर्माण करणार्या पेण तर्फे तळे येथील आरोपी संतोष चव्हाणला बौद्ध समाजाने माणगांव पोलीस प्रशासन आणि कोर्टाच्या माध्यमातून कायदेशीर चाप… !

- Advertisement -

माणगांव : सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर अन्य धर्मिय मुस्लिम तरूणांच्या नावाने तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्यांच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून दोन समाजात आणि धर्माधर्मात जातीय तेढ निर्माण करण्याच्या व दंगा फसाद घडवून आणण्याच्या उद्देशाने व सामाजिक स्वास्थ्य व सलोखा जाणीवपूर्वक बिघडवण्यासाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे जाणिवपूर्वक विदृपीकरण व विटंबना करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकणार्या रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या पेण तर्फे तळे गावातील कट्टर जातीयवादी मनोवृत्तीच्या संतोष रमेश चव्हाण नामक आरोपीस माणगांव पोलीसांनी १९ जुलै रोजी मध्य रात्री नंतर तात्काळ ताब्यात घेतले होते. २० जुलै रोजी माणगांव पोलीसांनी सदर आरोपीस माणगांव कोर्टासमोर हजर केले होते. माननीय कोर्टाने सदर आरोपीस जामीन मंजूर केला.

आरोपीने एवढे मोठे गैरकृत्य करून सुद्धा त्याला दोनच दिवसात बेल झाल्याने संपूर्ण माणगांव तालुका, रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्य आणि देशातील संपूर्ण तमाम बहुजन समाजाच्या भावना अनावर झाल्या आणि संपूर्ण देशातून या अनपेक्षित घटनेच्या विरोधात सर्वत्र तीव्र पडसाद उमटू लागले. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन सदर आरोपीच्या पेण तर्फे तळे गावातील सर्व ग्रामस्थांनी तात्काळ एकत्र येऊन आरोपी संतोष रमेश चव्हाण याने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर केलेल्या महापुरुषांच्या फोटोंचे विदृपिकरण व बदनामी आणि धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट चा जाहीर निषेध करून आरोपी संतोष रमेश चव्हाण या जातीयवादी विकृत मनोवृत्तीच्या तरुणा विरुद्ध माणगांव तहसीलदार यांच्या कडे लेखी तक्रार अर्ज करून आरोपीला त्याच्या गैरकृत्याबद्दल कठोर कारवाईची मागणी केली असून सदर आरोपी संतोष रमेश चव्हाण याला या प्रकरणी संपूर्ण गावातून कोणतीही व्यक्ती सहकार्य करणार नाही असे पेण तर्फे तळे गावकऱ्यांनी आरोपी संतोष रमेश चव्हाण याच्या विरोधात लिहिलेल्या तक्रार अर्जात सर्वानुमते म्हटले स्पष्ट आहे. आरोपी संतोष रमेश चव्हाण एका फार्मास्युटिकल कंपनीत एम आर म्हणून कार्यरत असून त्याची पत्नी पेण तर्फे तळे या गावची विद्यमान पोलीस पाटील पदावर कार्यरत आहे.

सदर आरोपी संतोष रमेश चव्हाण हा गेली अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर मुस्लिम तरूणांच्या नावाने तसेच विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्यांच्या नावाने फेक अकाऊंट ओपन करून त्या फेक अकाऊंट च्या माध्यमातून भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार जागतिक विद्वान विश्वरत्न महामानव, बोधिसत्व परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता मॉसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमांचे यथेच्छ विदृपीकरण आणि जाणीवपूर्वक बदनामीकारक विटंबना करून जातीय तेढ करणार्या पोस्ट अपलोड करत होता. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशातील तमाम आंबेडकरवादी आणि समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बहुजन समाजात संबंधित आरोपी विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
आयटी क्षेत्रात शाकीर असलेला आरोपी संतोष रमेश चव्हाण याच्या सोशल मीडियावरील गैरकृत्याचा भांडाफोड बहुजन समाजातील समाजातील आयटी क्षेत्रातील एक्सपर्ट तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने महापुरुषांच्या फोटोंचे विदृपिकरण करून व्हायरल केलेल्या सर्व पोस्ट तसेच चाट्स डिटेल्स प्राप्त करून सदर आरोपीच्या विरोधात संपूर्ण बहुजन समाज एकत्र येऊन रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस ठाण्यात फिर्यादी वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा महासचिव सागर भालेराव आणि बौदजन पंचायत समिती माणगांव तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या माध्यमातून प्रातिनिधिक स्वरूपात वंचित रायगड जिल्हा अध्यक्ष मार्गदर्शक विश्वतेज साळवी, रिपब्लिकन कामगार सेना अध्यक्ष श्री रमेश जाधव, बामसेफ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे सुर्यकांत कासे सर, समाजातील भावी वकील भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष राकेश मोरे, तेजस कासे, वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुका अध्यक्ष सारथी म्हामुनकर, वंचित बहुजन आघाडी माणगांव तालुका महासचिव रोहन साळवी, आर डी साळवी, रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते भाई नामदेव कासारे, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सहाय्यक कुल सचिव विकास दादा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेश कासारे, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक रोहित पारधे, माणगांव पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार उत्तम तांबे, सल्लागार विश्वास गायकवाड, माजी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रायगड श्री नितीन मोरे, बामसेफ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे दिपक मोरे माणगाव तालुक्यातील बौदजन पंचायत समिती शाखा क्रमांक ११ चे अध्यक्ष संतोष कासारे, भारतीय बौद्ध महासभेचे माननीय सिद्धार्थ सोनावणे, कोषाअध्यक्ष विजय जाधव, आणि विविध सामाजिक धार्मिक संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते निलेश साळवी, मिलिंद साळवी, अमर गाडे, परमेश्वर गाडे, सुशील कासारे, प्रबुद्ध जाधव अरविंद मोरे, संजय गमरे, सिद्धार्थ मोरे, रमेश घोगरे, अजय कासारे, रोहीत सकपाळ, प्रदिप जाधव, शुभांगी सोनावणे, शरद पवार आणि सिंबॉल ऑफ नॉलेज सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य इत्यादी शेकडो कार्यकर्त्यां वतीने माणगांव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. उध्दव माणिक सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल करे, यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे. या मध्ये सदर आरोपी सह असलेल्या सहआरोपी आणि त्यांच्या मागे असलेल्या जातीयवादी समाजकंटक, समाज विध्वंसक शक्तीसह सुत्रधारांचा या प्रकरणात हात असल्याची संपूर्ण बहुजन समाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे संबंधितांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सर्व बहुजन समाजातून मागणी केली आहे.
माणगांव पोलीस ठाण्यात पेण तर्फे तळे येथील संबंधित आरोपी संतोष रमेश चव्हाण या कट्टर जातीयवादी विकृत मनोवृत्तीच्या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर महापुरुषांच्या फोटोंचे विदृपिकरण करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टस मुळे दोन समाजात सामाजिक व धार्मिक स्तरावर तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची वेळ आली. आरोपीच्या अशा निंदनीय गैरकृत्यामुळे तमाम बहुजन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे त्याच्या या समाज विघातक गैरकृत्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या ६६ ( सी ) आयपीसी आयटी अॅक्ट २९५ ए, १५३ ए, १५३ बी, १२० बी, १२४,४९९, ५००, त्याच बरोबर अनुसूचित जाती जनजाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा 3 X R आणि 3X नुसार कारवाई करण्यात यावी अशी कायदेशीर मागणी केली असून रायगड जिल्हा सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री गुंजाळ यांनी माणगांव डीवायएसपी शशिकिरण काशिद यांना तसा आदेश दिला आहे. त्या नुसार संबंधित आरोपीचा जामीन ना मंजूर करण्यात यावा अशी मागणी माणगांव पोलीसांनी माननीय माणगांव कोर्टाकडे केली होती. त्या नुसार शुक्रवार दिनांक २४ जुलै २०२० रोजी माननीय माणगांव कोर्टाने जामीन फेटाळून लावल्याने माणगांव पोलीसांनी आरोपी संतोष रमेश चव्हाण याला पुन्हा पोलीस कस्टडीत घेतले असून सदर केस संदर्भातील अधिक तपास माणगांव डीवायएसपी शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सदर प्रकरणात इंडियन लॉयर प्रोफेशनल असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बामसेफ संघटनेचे सुप्रीम कोर्टाचे वकील माननीय अॅड. राजकुमार थोरात साहेब यांनी विशेष लक्ष घालून ते या प्रकरणी मार्गदर्शन करत आहेत. संबंधित प्रकरणी संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन माणगांव पोलीस प्रशासनाने संपूर्ण बहुजन समाजाला दिले आहे.

- Advertisement -