Home शहरे उस्मानाबाद जातीवाचक अपशब्दासह उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध तीन गुन्हे

जातीवाचक अपशब्दासह उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध तीन गुन्हे

0

उस्मानाबाद । जिल्हा प्रतिनिधी । ३ जून : मागील दोन तीन दिवसात जिल्ह्यात मारहाणीच्या तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा आणि उस्मानाबाद या पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मागील कुरापती वरून मारहाण, शिवीगाळ, धमकी आणि जातीय शिवीगाळ केल्याचेही प्रकरण आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: मनोज लांडगे, कुमार लांडगे, पांडुरंग लांडगे, उमेश लांडगे, लक्ष्मण लांडगे, गेनदेव लांडगे, चांगदेव लांडगे सर्व रा. बिजनवाडी, ता. तुळजापूर यांनी दि. 31.05.2020 रोजी 18.30 वा. सु. बिजनवाडी शेत गट क्र. 150 मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन भाऊबंद- अनंत किसन लांडगे व विकास लांडगे यांना शिवीगाळ करुन, लोखंडी गजाने, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच अनंत लांडगे यांच्या शेतातील पीव्हीसी पाईप फोडून आर्थिक नुकसान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अनंत लांडगे यांच्या फिर्यादीवरुन नमुद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उमरगा: दिनकर शंकर मगे रा. कोळसुर (ग.), ता. उमरगा हे दि. 01.06.2020 रोजी 21.00 वा. सु. गावातीच मारुती मंदर समोरून घरी जात होते. यावेळी गावातीलच- निंगाप्पा गुंडप्पा माळी, मल्लाप्पा माळी या दोघा भावांनी शेतबांधाच्या कारणावरुन दिनकर मगे यांना शिवीगाळ करुन, काठीने मारहाण केली. यात दिनकर मगे यांचा उजवा हाताचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या दिनकर मगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमुद दोघांविरुध्द गुन्हा दि. 02.06.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): शंकर अभिमान शितोळे, रा. टीपीएस रोड, उस्मानाबाद हे दि. 29.05.2020 रोजी 22.30 वा. सु. स्वत:च्या राहत्या घरा समोर होते. यावेळी कॉलनीतील- अक्षय मुंडे, धनंजय मुंडे, प्रितम मुंडे, अमोल पवार, रामभाऊ मुंडे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शंकर शितोळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, फायटर- दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शंकर शितोळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 03.06.2020 रोजी नोंदवला आहे.