Home बातम्या जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंचाहत्तरी निमित्त देशभरातील ७५ जादुगारांच्या हस्ते सत्कार

जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंचाहत्तरी निमित्त देशभरातील ७५ जादुगारांच्या हस्ते सत्कार

0

जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंचाहत्तरी निमित्त देशभरातील ७५ जादुगारांच्या हस्ते सत्कार
……………………………..
२१ ऑक्टोबर रोजी पुण्यात ७५ जादुगारांच्या जादूचा आविष्कार

पुणे : परवेज शेख

पुण्यातील ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंचाहत्तरी निमित्त देशाबाहेरील आणि देशभरातील ७५ जादुगारांच्या हस्ते सत्कार सोमवार,२१ ऑक्टोबर रोजी पुण्यात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून जादूगारांच्या जादूचा आविष्कार दाखविण्यात येणार आहे.या ७५ जादूगारांमध्ये परदेशातील ४ जादूगारांचा समावेश आहे.

‘सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्स ‘ या संस्थेने या जीवनगौरव सोहळ्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा सोहळा पीवायसी जिमखाना, पुणे येथे २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.पीवायसी जिमखान्याच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमाला जिमखाना सदस्य उपस्थित राहणार आहेत.

‘सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्स ‘ चे अध्यक्ष भूपेश दवे ( मुंबई ) यांच्या हस्ते चंद्रशेखर चौधरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

१९६१ साली पुण्यात जादूचा पहिला प्रयोग करणाऱ्या चंद्रशेखर चौधरी यांनी देशभरात, देशाबाहेर हजारो जादूचे प्रयोग केले. बल्ब निर्मिती करणारे उद्योजक असतानाही चौधरी यांनी जादूगार म्हणून यशस्वी कारकिर्द केली. इंटरनॅशनल मॅजिक स्टार, लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. मॅजिशियन्स असोसिएशन पुणे या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. जादूगारांची पुण्यात अधिवेशने आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा सन्मान २१ रोजी केला जाणार आहे.