हायलाइट्स:
- राज कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळाल्याने राजचे वकील नाराज
- याप्रकरणातील अन्य आरोपींना जामिन मिळतो मग राजलाच का नाही वकिलांचा प्रश्न
- मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी
जामिन न मिळाल्याने वकील नाराज
राज कुंद्राचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्याचे वकील नाराज झालेले दिसले. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातही राज कुंद्राच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी केली जाणार आहे. राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक झाली होती.त्यानंतर त्याला २३ जुलै पर्यंत आणि त्यानंतर २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. मंगळवारी किला न्यायालयाने केलेल्या सुनावणीवेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
काय झाले न्यायालयात
राज कुंद्राच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी एप्रिल महिन्यात चार्जशीट सादर केली आहे. अनेक आरोपींना जामिनही मिळाला आहे. मग राज कुंद्रालाच जामिन का दिला जात नाही? यावर पब्लिक प्रॉसिक्युटरने राज कुंद्रा हा मुख्य आरोपी असून तो अतिशय प्रभावशाली आहे. जर त्याला सोडले तर या खटल्यातील तपासात अडथळा आणू शकतो तसेच साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो असा मुद्दा मांडला. त्यावर राजचे वकिलांनी , तो काय दहशतवादी आहे का असा युक्तिवाद केला. त्या नंतरही न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थॉर्पे या दोघांचा जामिन अर्ज फेटाळून लावला.
पोलिसांनी नोंदवला गुन्हा
मुंबई पोलिसांनी बुधवारी राज कुंद्राने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. एका अभिनेत्रीच्या तक्रारीवरून गहना वशिष्ठ आणि चार निर्मात्यां विरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या नवीन एफआयआरमध्ये राज कुंद्राचे नाव नाही. परंतु तपास अधिकाऱ्यांनी कोणत्या पाच व्यक्तींना आरोपी केले आहे ते सांगितलेले नाही. परंतु हे सर्वजण राजच्या कंपनीसाठी काम करत होते हे नक्की.
आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर भिस्त
राज कुंद्राला झालेली अटकही बेकायदा असल्याचा मत त्याच्या वकीलांनी सातत्याने मांडले आहे. राज कुंद्रावर आयटी कलम ६७ अ अंतर्गंत कारवाई करण्यात आली आहे. राजच्या वकीलांच्या मते राजवर लावण्यात आलेली ही कलमे लावणे योग्य नाही, कारण त्यांनी तयार केलेले सिनेमे हे पॉर्न नाही तर इरॉटिक आहेत. आता राजला जामिन मिळणार की नाही हे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हातात आहे. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
फॉरेन्सिक ऑडिटर्स करत आहेत तपास
दरम्यान, या प्रकरणी क्राईम ब्रँचच्या फॉरेन्सिक ऑडिटर्सही तपासात सहभागी झाले आहेत. फॉरेन्सिक ऑडिटर्सची टीम राज कुंद्राच्या बँक अकाउंट्सची छाननी करणार आहे. त्याचप्रमाणे ते शिल्पा शेट्टीच्या अकाउंटचाही तपास करण्याची शक्यता आहे. राज कुंद्राने त्याचा मेव्हणा प्रदीप पक्शीला ‘हॉटशॉट्स’ अॅप विकले होते. या अॅपच्या माध्यमातून त्याला १.१७ कोटी रुपये मिळायचे. पोलिसांनी नजर आता पॉर्न सिनेमांमधून होणाऱ्या कमाईवर आहे. हे पैसे कुठून आले आणि कुठे कुठे गेले या सगळ्याचा तपास पोलिस करणार आहेत.