Home शहरे औरंगाबाद जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चक्क रस्ताच वाहून गेला

जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चक्क रस्ताच वाहून गेला

जालना : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. रविवारी सकाळपासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठले असून काही ठिकाणी झाड पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. शनिवारी पुण्यात पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता जालना जिल्ह्यात पावसाच्या पाण्यात रोड वाहून गेल्याची घटना घडली आहे.  मुसळधार पावसाच्या पाण्यात चक्क रोड वाहून गेल्याच या व्हिडीओत दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी या रस्त्यावरुन गाड्यांची ये-जा सुरू होती. सुदैवाने रोड वाहिल्याचं दिसताच, गाड्या जागेवर थांबल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, रस्ता वाहून गेल्यानं वाहतूक बंद झाली असून प्रवाशी चिंतातूर झाले आहेत.