Home ताज्या बातम्या जास्त संवेदनशीलतेने जनसामान्यांना सेवा उपलब्ध करा – राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव – महासंवाद

जास्त संवेदनशीलतेने जनसामान्यांना सेवा उपलब्ध करा – राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव – महासंवाद

0
जास्त संवेदनशीलतेने जनसामान्यांना सेवा उपलब्ध करा – राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव – महासंवाद

तुमची सेवा हेच आमचे कर्तव्य

सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (जि.मा.का.) : ‘तुमची सेवा हेच आमचे कर्तव्य’ हे आपले घोषवाक्य आहे. त्यामुळे जास्त संवेदनशीलने जनसामान्यांसाठी सेवा उपलब्ध करा, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव यांनी केले.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपीता सेवा पंधरवडा अंतर्गत  डॉ. जाधव यांनी आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित  सेवांचा जिल्ह्यातील प्रंलबित अर्जांचा आढावा घेत संगणकीय सादरीकरणाव्दारे  मार्गदर्शन केले. सेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित सेवांचा समावेश आहे. लोकसेवेचा तपशील त्यासाठी विहित केलेली कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी, व्दितीय अपिलीय अधिकारी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. येणाऱ्या अडचणीबाबतही त्यांनी यावेळी चर्चा केली. शेवटी तुमची सेवा हे आमचे कर्तव्य या घोषवाक्य प्रमाणे सर्वांनी सर्वसामान्य लोकांना सेवा उपलब्ध करुन द्यावी, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनीही जनसामान्य लोकांना सेवा उपलब्ध करुन देताना दक्ष राहून अधिक लक्ष घालावे. सर्वसामान्य लोकांसाठी सर्व यंत्रणा असते. त्याबाबत  सर्वांनी संवेदनशील रहावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.जयकृष्ण फड, उपजिल्हाधिकारी  रवींद्र मठपती, प्रांताधिकारी प्रंशात पानवेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, जिल्हा  कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले आदी अधिकारी उपस्थित होते.

0000