जिओ गिगा फायबर १२ ऑगस्टपासून

- Advertisement -

मुंबई : रिलायन्स जिओच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित जिओ गिगा फायबरची व्यावसायिक सेवा १२ ऑगस्टपासून सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. १२ ऑगस्टला रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून त्यामध्ये या विषयी घोषणा होण्याची शक्यता आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही आर्थिक निकाल गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले. गिगा फायबर सेवेची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात असून ही चाचणी यशस्वी ठरली आहे. कुटुंबाच्या सायबरसंबंधी सर्व गरजा पूर्ण करू शकेल, अशी एकत्रित व्यावसायिक पॅकेजसेवा लवकरच सुरू करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात पाच कोटी घरांना याचा लाभ होईल, असे या समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तिमाही निकाल घोषित करताना सांगितले होते. 

गिगा फायबरची सेवा देशभरातील १,१०० शहरांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. या एकाच प्लॅनमध्ये ब्रॉडबॅण्ड, लँडलाइन व्हॉइस कॉल, आयपीटीव्ही आदी अनेक सुविधा उपलब्ध असतील. काही शहरांतील निवडक ठिकाणी सद्यस्थितीत गिगा फायबरची सेवा प्रायोगिक तत्त्वावर देण्यात येत आहे.

- Advertisement -