Home शहरे जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीची स्थापना

जिल्हास्तरीय प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीची स्थापना

अलिबाग,जि. रायगड : जिल्ह्यातील प्राणी कल्याण व मानवहितकारक कार्य कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील पांजरपोळ/गेाशाळा संस्थाचे अध्यक्ष व शासकीय स्तरावरुन नामनिर्देशित केलेल्या निवड करुन जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समीतीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असून व शासनाने नियुक्त केलेले अशासकीय अध्यक्ष भगवान बाबु ढेबे, अशासकीय सदस्य, सदाशिव वामनराव ठोंबरे, डॉ. संगिता सुर्यकांत चिजगोठे, रमेश हरिभाऊ वारदे, चंद्रकांत लक्ष्मण पवार हे आहेत तर या समितीचे सदस्य सचिव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुभाष म्हस्के हे आहेत.

या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.8) पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चोपडे, डॉ. शहा, चौलकर, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित समिती सदस्यांना शासनाचे अधिनियम, शासननिर्णय, अशासकीय सदस्यांच्या जवाबदाऱ्या, कर्तव्य आदीं बाबत उपजिल्हाधिकारी मठपती यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी व कायद्याचे पालन करावे असे निर्देश त्यांनी उपस्थितांना दिले.

यावेळी शासनाच्या अधिनियमाचे पालन व्हावे, सदस्यांना ओळखपत्र देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, जिल्हास्तरीय समीतीची अधिकृत नोंदणी धर्मादाय आयुक्त अलिबाग-रायगड यांचेकडे करावी, विधीतज्ज्ञ यांच्या सल्ल्याने शासनाने विहीत केलेल्या नियम प्रणालीचे पालन करावे आदी निर्णय घेण्यात आले. तसेच जिल्हास्तरावर प्राणी क्लेश प्रतीबंधक सोसायटी बाबत जनजागृती करावी या करीता हेल्पलाईन जाहीर करणे, भिंतीपत्रके लावणे, शाळा महाविदयालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम आयोजीत करणे, थनाटयाव्दारे जनजागृती करणे, ग्रामसभेमध्ये जनजागृती,वर्तमानपत्रातुन प्रसीध्दी देणे व वेबसाईटवर प्रसिद्धी देण्याच्या उपाययोजना कराव्या असे ठरविण्यात आले. डॉ. म्हस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.