नागपूर, दि. 6 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांची ‘नागपूर जिल्ह्यातील जलसाठे व पावसाळ्यातील व्यवस्थापन’ या विषयावर उद्या विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे.
ही मुलाखत https://youtu.be/2tvFirwi1B8 या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 14 जुलै 2022 रोजी दुपारी 4.30 वाजता प्रसारीत होईल.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. दुपारी 4.30 वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल. यासाठी वेबेक्स लिंक जाहीर केली जाणार आहे.
‘नागपूर जिल्ह्यातील जलसाठे व पावसाळ्यातील व्यवस्थापन’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे या कार्यक्रमातून करणार आहेत. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
000