जिल्ह्यात घडले आर एस पी चे 39 अधिकारी
जिल्हा मुख्यालय येथे पार पडले प्रशिक्षण
शेख इम्रान
बुलढाणा:-
अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अपघातामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडून त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे या प्रकाराला आळा घालण्यासाठी जनतेमध्येट्राफिक सेन्स निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे यासाठीच वाहतूक सुरक्षा दल च्या माध्यमातून हे कार्य शाळास्तरावर करण्याची काम जिल्ह्यात सुरु आहे.
बुलढाणा येथे गेल्या 29 जानेवारी ते 4फेब्रुवारी पर्यंत जिल्हा पोलीस विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांच्या संकल्पनेतून बुलढाणा मुख्यालय पोलिस कवायत मैदान येथे सात दिवसीय निवासी प्रशिक्षण घेण्यात आले यामध्ये जिल्ह्यातील शिक्षकांमधून 39 अधिकारी जिल्हात तयार करण्यात आले आहे हे आर एस पी अधिकारी आपल्या शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षा व नियमाबद्दल जाणीव जागृती निर्माण करण्याचे काम करणार आहे आर एस पी रस्ता सुरक्षा पथक (रोड सेफ्टी पेट्रोल) हे प्रशिक्षण देण्यासाठी महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली है प्रशिक्षण पार पडले .
होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी शासन; सरकार स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत मात्र तरीसुद्धा अपघातांना पाहिजेत असा हा असा आळा बसत नाही त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे त्यामुळेच शासनस्तरावरून विद्यार्थी व लहान मुलांमध्ये आता रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती निर्माण करण्याचे काम आर.एस.पी च्या माध्यमातून होत आहे. लहान मुलांनी जर पालकांना वडीलधाऱ्या मंडळींना सांगितले मंडळींना सांगितले हेल्मेट वापरा; चालू वाहनवरती मोबाईल वरती बोलू नका तर पालक या लहान मुलांच्या गोष्टी कडे लवकर लक्ष देतात व ते ऐकतात त्यामुळे नक्कीच अपघाताच्या प्रमाणात कमी येईल रस्त्यावरील सुरक्षेसाठी धावपळीच्या जीवनात काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यामध्ये थांबा वेग कमी करा; बेल्ट बांधा ;वाहतुकीच्या चिन्हाचे पालन करा; गतीच्या मर्यादेचे पालन करा; वाहन सुरक्षित ठेवा ;मोबाईलचा कधीही ड्रायव्हिंग करताना वापर करू नका ;हेल्मेटचा वापर करा ;कधीही धोकादायक रीतीने गाडी चालू नका; नम्रतेची वर्तणूक करा ;दारू पिऊन गाडी चालवू नका यांचा समावेश आहे ते सर्व नियमांचे पालन जर प्रत्येक वाहनधारकांना केले तर नक्कीच अपघाताला आळा घालता येऊ शकतो भविष्यात लवकरच आरएसपी ची एक मोठी चळवळ निर्माण होईल असा विश्वास महासमादेशक अरविंद देशमुख महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केला आहे.
या सर्व प्रशिक्षणाला यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे; जिल्हा वाहतूक निरीक्षक बी आर गीते यांनी विशेष सहकार्य लाभले.या वेळी जिल्हा वाहतूक विभाग चे ए एस आय विलास कड ;शिक्षण विभागाचे श्री वायाळकर ; श्री नालेगावकर यानि परिश्रम घेतले .
बॉक्स
एक जरी अपघात रोखल तरी ईश्वरी कार्य :-डॉ. दिलीप पाटील भुजबळ
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रस्ता व नागरी सुरक्षा संबंधित प्रशिक्षणार्थींना परिपूर्ण माहिती झाली आहे .प्रशिक्षणार्थी नक्कीच आपल्या शाळा स्तरावर जाऊन नक्कीच समाजात वाहतूक नियमाबद्दल जनजागृती करतील आणि त्यामुळे आपण एक जरी अपघात रोखला तर हे ईश्वरी कार्य ठरेल असे मत डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलून दाखवले.