जी मुलगी जिवंत नाही, तिची बदनामी कशासाठी करता? विकास गुप्तावर भडकली काम्या पंजाबी

जी मुलगी जिवंत नाही, तिची बदनामी कशासाठी करता? विकास गुप्तावर भडकली काम्या पंजाबी
- Advertisement -


हायलाइट्स:

  • विकास गुप्तावर भडकली काम्या पंजाबी
  • प्रत्युषा बॅनर्जीबद्दल विकासने जे काही सांगितले ते योग्य नसल्याचे काम्याचे मत
  • प्रत्युषा हयात नसताना तिच्या बद्दल असे बोलणे योग्य नाही

मुंबई : टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने विकास गुप्तावर कडाडून टीका केली आहे. विकास गुप्ताने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ला डेट करत होता आणि ती बायोसेक्शुअल असल्याची माहिती तिच्याशी ब्रेकअपनंतर मिळाली होती.

काय म्हणाली काम्या पंजाबी

विकास गुप्ताने त्याच्या मुलाखतीमध्ये जो काही खुलासा केला त्यावरून काम्या खूपच भडकली आहे. ती म्हणाली, ‘प्रत्युषा आता या जगात नाही, त्यामुळे खरे काय आहे हे सांगायला ती इथे नाही. त्यामुळे यामध्ये किती तथ्य आहे हे कुणीच सांगू शकत नाही. विकास त्याच्या भूतकाळाबद्दल आता का सांगत आहे? त्याला प्रसिद्धी हवी आहे का? ही गोष्ट नक्कीच चांगली नाही. विकासची मुलाखत पाहिलेली नाही, कोणतीही बातमी वाचलेली नाही. मला तर हे देखील माहिती नाही की प्रत्युषाबद्दल जे लिहिलं आहे, ते खरे आहे की खोटे. विकास जे काही बोलला त्याबद्दल मला एका मित्राने सांगितले आहे.’

काम्याने पुढे सांगितले की, ‘तिच्या आयुष्यामध्ये नेमके काय झाले काय नाही त्याबद्दल आता आपण काय बोलायचे. आता ती आपल्यासोबत नाही. तिचं खासगी आयुष्य होतं. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचा आता कुणालाही अधिकार नाही.

काय म्हणाला होता विकास

विकास गुप्ताने मुलाखतीमध्ये म्हटले होते की, प्रत्युषाला तो डेट करत होता. अर्थात आमचे हे नाते कमी वेळासाठी होते. तेव्हा प्रत्युषा समलैंगिक असल्याची माहिती नव्हती. आमचे ब्रेकअप झाल्यानंतर प्रत्युषाच्या समलैंगिक असण्याबद्दल मला समजले.’ विकासने या मुलाखतीमध्ये असाही दावा केला होता की, प्रत्युषा त्याच्याशिवाय आणखी एका मुलीला डेट करत होती. त्या मुलीचे नाव सांगण्यास त्याने नकार दिला.

काम्याने त्यावर विचारला प्रश्न

विकासने त्याच्या मुलाखतीमध्ये ज्या दुसऱ्या मुलीचा उल्लेख केला आहे, तिचे नाव त्याने का नाही जाहीर केले, असा प्रश्न काम्याने उपस्थित केला. केवळ ती मुलगी जिवंत आहे आणि ती स्वतःला अशा आरोपांपासून वाचवू शकते म्हणून या साऱ्या गोष्टी घडत आहे, त्या खूप दुर्दैवी आहेत. हे प्रकरण खूपच नाजूक आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगून आणि संवेदनशीलपणेच बोलायला हवे.

प्रत्युषाच्या मृत्यूनंतर काम्या पंजाबी आणि विकास गुप्ता या दोघांनी तिला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र लढा दिला होता. प्रत्युषा बॅनर्जीने एप्रिल २०१६ मध्ये आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या मृत्यू मागचे कारण अजूनही समोर आलेले नाही.



Source link

- Advertisement -