Home शहरे अहमदनगर जुन्या ग्रामपंचायतिच्या इमारतीच्या सार्वजनिक वाचनाल्याच्या खोलीत दोराने गळफास लावून आत्महत्या

जुन्या ग्रामपंचायतिच्या इमारतीच्या सार्वजनिक वाचनाल्याच्या खोलीत दोराने गळफास लावून आत्महत्या

कोपरगाव [बिपिन गायकवाड] प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत मधिल शिपाई कम वाॕलमन याने जुन्या ग्रामपंचायतिच्या इमारतीच्या सार्वजनिक वाचनाल्याच्या खोलीत दोराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि.०७ जुलै २०२० रोजी सकाळी धामोरी येथे घडली या शिपाई कम वाॕलमन याने आत्महत्या का केली याचे कारण समजु शकलेले नाही.
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत वाचनाल्यात आज सकाळी ग्रामपंचायत मध्ये शिपाई या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी मोहन आबाजी वाणी (वय ४५)यांनी आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास अज्ञात कारणामुळे छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सदरचे सविस्तर माहिती असे की कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हि मोठी व सधन ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायतित जवळपास सात कर्मचारी कार्यरत आहे यामध्ये पंधरा वर्षापूर्वी सेवेत दाखल होते त्यांनी आपल्या सेवेची पंधरा वर्ष पूर्ण केली होती त्यांच्या कौटुंबिक ताणतणावामुळे ते काही दिवासांपासून चितेंत असल्याचे या परिसरातील लोकांची गावात चर्चा चालु होती तसेच त्यांच्या घराचे काम चालु असाल्याने ते ग्रामपंचायत कार्यल्याच्या मागील बाजुस असलेल्या जुन्या ग्रामपंचायत कार्यल्याच्या एका खोलीत रहात होते ग्रामपंचायत कार्यल्याची चावी त्यांच्या कडे राहत असाल्यामुळे आज सकाळी ते कोणाचे त्यांच्या कडे लक्ष नाही अशी संधी साधुन ते वाचनाल्याच्या खोलीत आले व त्यांनी इमारतीच्या छताला दोरी बांधून खुर्चीचा वापर करुन आपली जिवनयात्रा संपवली त्यांना उपचारा साठी कोपरगाव ग्रामिण रुग्णालयांत आनले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणी नंतर मृत घोषित केले त्या मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पच्छात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे या घटनेची कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद क्रं ३४/२०२० सी.आर.पी.सी.प्रमाणे नोंद करण्यात आली असुन पुढिल तपास पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॕ.चंद्रकांत तोर्वेकर हे करीत आहेत या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.