Home मनोरंजन जॅकी श्रॉफ यांना आवडला नाही लेकीचा एकही बॉयफ्रेंड? म्हणाले…

जॅकी श्रॉफ यांना आवडला नाही लेकीचा एकही बॉयफ्रेंड? म्हणाले…

0
जॅकी श्रॉफ यांना आवडला नाही लेकीचा  एकही बॉयफ्रेंड? म्हणाले…

[ad_1]

मुंबई: बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केललं नसतानाही कृष्णाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कृष्णानं आपल्या खासगी आयुष्याबद्दल कोणतीच गोष्ट चाहत्यापासून लपवलेली नाही. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत कृष्णानं तिचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप यावर चर्चा केली होती. पण आता तिचे वडील अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी मात्र मुलीच्या बॉयफ्रेंडबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. जेव्हा कृष्णाला तिच्या बॉयफ्रेंडबाबत जॅकी श्रॉफ यांची काय प्रतिक्रिया आहे असं विचारलं त्यावर कृष्णानं सर्वांनाच हैराण करणारी गोष्ट सांगितली.

बॉयफ्रेंड्सबद्दल वडिलांच्या प्रतिक्रियेबाबत बोलताना कृष्णा म्हणाली, ‘मला नाही वाटत आजपर्यंत माझे जे काही बॉयफ्रेंड राहिले आहेत त्यापैकी कोणी बाबांना आवडला असेल. अर्थात मी त्यांना दोष देणार नाहीये, त्यांचंही बरोबर आहे.’ दरम्यान याबाबत बोलताना जॅकी श्रॉफ एका मुलाखतीत म्हणाले, ‘तिला जो कोण आवडतो किंवा ज्याच्यावर तिचं प्रेम आहे. त्यांचा मी सन्मान करतो. तिला तिचा प्रवास स्वतः करायचा असला तरीही एक वडील या नात्यानं तिच्यासाठी योग्य लडका शोधणं खरंच कठीण आहे.’

जॅकी श्रॉफ यांना, ‘आपली मुलगी कधीतरी आपल्यापासून दूर जाईल याची भीती वाटली आहे का? किंवा तुम्ही कधी एक प्रॉटेक्टिव्ह वडील झाले आहात का?’ असा प्रश्न विचारल्यावर ते सांगतात, ‘मी माझ्या दोन्ही मुलांच्या बाबतीत कधीच असा वागलो नाही. हे त्यांच्या प्रेमाविषयी आहे. अखेर त्यांना त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं आहे. आई-बाबा नेहमीच त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत. त्यांना आयुष्यात त्यांच्यावर प्रेम कराणारी आणि काळजी घेणारी व्यक्ती शोधावी लागेल. म्हणूनच मी म्हणतो माझ्या राजकुमारीसाठी असा कोणता मुलगा शोधणं खूप कठीण आहे. ‘

जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, ‘माझी मुलं, कृष्णा आणि टायगर दोघंही स्पष्टवक्ती आणि गंभीर आहेत. दोघांचंही मन साफ आहे. मी नशीबवान आहे की, माझ्याकडे अशी मुलं आहे जे मला आनंद देतात. त्यांच्या मनात कोणासाठीच वाईट भावना नाहीये. ती माझी मुलं आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक करत नाहीये. त्यांच्या बोलण्यातून या गोष्टी मला जाणवतात. ते माझ्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. कृष्णाला व्यायाम आणि मार्शल आर्टची आवड आहे. तर टायगरला फिटनेससोबतच जिम्नेस्टिक आणि डान्सची आवड आहे.’

[ad_2]

Source link