Home शहरे अहमदनगर जेऊर हैबती येथे दीड लाखांची घरफोडी

जेऊर हैबती येथे दीड लाखांची घरफोडी

0

कुकाणा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबत्ती येथील राम बंडू शिंदे यांच्या बंद घराचा कडी, कोयंडा तोडून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तीस हजार रुपये असा एकणू दीड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.  
याबाबत राम शिंदे यांनी कुकाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री १० वाजता अचानक घरातील विजेमध्ये बिघाड झाला होता. यामुळे माझ्या पत्नीचे जेऊरमध्येच राहत असलेले मामा सुभाष औटी यांच्या घरी आम्ही झोपण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, मंगळवारी पहाटे रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान माझ्या घरात काही तरी आदळ-आपटचा होत असल्याचा आवाज येत आहे. हे शेजारी राहात असलेले माझे बंधू हरी शिंदे यांनी ऐकले. परंतु त्यांच्या घराची बाहेरील कडी लावलेली असल्याने त्याला बाहेर येता आले नाही. त्याने मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता मी तातडीने तेथे आलो. परंतु तोपर्यंत त्या चोरट्यांनी पळ काढला. ते चार जण होते. या चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते, असेही माझ्या बंधुने सांगितले. यावेळी या चोरट्यांनी घरातील सर्व सामानाची व कपाटाची उचकापाचक करून सोन्याचे झुंबर नऊ ग्रॅम, चांदीचे लहान बाळाचे चाळ, चार व मोठे दोन चाळ, सोन्याची आठ ग्रॅम पोत, १० ग्रॅम सोन्याची अंगठी, बाळ्या चार ग्रॅम, पाच ग्रॅमची नथ असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.