Home ताज्या बातम्या जेजुरीत वृध्दाची आत्महत्या, घातपाताचा संशय

जेजुरीत वृध्दाची आत्महत्या, घातपाताचा संशय

0

पुरंदर : पुरंदर मधिल जेजुरीत एका वयोवृद्धाने भरचौकात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जेजुरीतील मिसळ हाऊस समोरील तनाज घरसंसार सेल्स या दुकानाच्या बंद शटर समोर त्यांनी गळफास घेतली. पत्र्याच्या शेडच्या अँगलला लटकून त्यांनी फास लावला. अंदाजे 80 वर्षाच्या अनोळखी पुरुषाने धोतराने गळफास घेतल्याची माहिती आहे.

ही खरंच आत्महताय आहे की घातपात आहे याचा शोध घेण्याची मागणी केली जात आहे. जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. जेजुरी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.