Home मनोरंजन जेव्हा अडल्ट फिल्म पाहताना पकडला गेला होता प्रसिद्ध अभिनेता, मावशीनं पाहिलं आणि…

जेव्हा अडल्ट फिल्म पाहताना पकडला गेला होता प्रसिद्ध अभिनेता, मावशीनं पाहिलं आणि…

0
जेव्हा अडल्ट फिल्म पाहताना पकडला गेला होता प्रसिद्ध अभिनेता, मावशीनं पाहिलं आणि…

[ad_1]

हायलाइट्स:

  • अभिनेता विक्रांत मेस्सी लवकरच ‘हसीन दिलरूबा’ चित्रपटातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
  • विक्रांत मेस्सीनं मुलाखतीत शेअर केला त्याच्या आयुष्यातील लाजिरवाण्या प्रसंगाचा अनुभव
  • अडल्ट फिल्म पाहताना पकडला गेला होता विक्रांत मेस्सी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी, तापसी पन्नू आणि हर्षवर्धन राणे यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘हसीन दिलरुबा‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. सध्या हे तिनही कलाकार त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या तिघांनीही त्यांच्या आयुष्यात घडलेल्या लाजिरवाण्या प्रसंगांचे अनुभव शेअर केले. पण विक्रांतनं जो किस्सा सांगितला तो ऐकल्यावर हसू आवरणार नाही.

आर जे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत मेस्सी म्हणाला, ‘माझ्या आयुष्यातील सर्वात लाजिरवाणा प्रसंग माझ्या आजीच्या घरी घडला होता. मी माझ्या इतर भावंडांसोबत एक अडल्ट फिल्म पाहत होतो आणि तेवढ्यात माझी मावशी आमच्या खोलीत आली. आम्हाला वाटलं नव्हतं की, ती पहाटे ३ वाजता उठेल. आम्ही सर्वच पकडले गेलो होतो. त्यानंतर मला काही दिवस आजीच्या घरी राहायचं होतं पण त्यादरम्यानच्या काळात मला मावशीच्या समोर जाण्याचीही लाज वाटत असे. माझी मावशी चांगली आहे. तिनं यातलं काहीच आईला सांगितलं नाही. तिला माहीत होतं की मुलं आता मोठी झाली आहेत.’


या मुलाखतीत तापसीनंही तिचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, ‘अनेकदा आम्ही सर्वजण टीव्हीवर तेच पाहायचो जे आमचे बाबा पाहायचे पण एखादवेळी जर चित्रपट सुरू असेल आणि त्यात एखादा बोल्ड सीन आल्यावर मी आणि माझी बहीण गोंधळून एकमेकांकडे पाहत असू. त्यावेळी संपूर्ण कुटुंब असहज होत असे.’

‘हसीन दिलरूबा’ या चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटाची कथा एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. या चित्रपटात तापसी आणि विक्रांतची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. पण त्यांच्या आयुष्यात हर्षवर्धनची एंट्री होते आणि दोघांचंही आयुष्य अचानक बदलून जातं. या चित्रपटाचं दिग्दर्शन विनिल मॅथ्यू यांनी केलं आहे.



[ad_2]

Source link