Home ताज्या बातम्या ज्या ठिकाणी वडील पोलीस कॉन्स्टेबल या जिल्ह्याचे एसपी म्हणून मुलाचे पोस्टिंग

ज्या ठिकाणी वडील पोलीस कॉन्स्टेबल या जिल्ह्याचे एसपी म्हणून मुलाचे पोस्टिंग

0

पुणे : परवेज शेख

   कोणत्याही आई-वडिलांचे एकच स्वप्न असते की त्यांची मुले शिकून, खूप मोठी होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागून आनंदात रहावीत. मुलांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांचे आई-वडील पडेल ते कष्ट करतात. मुलं जेव्हा चांगली नोकरी लागून मार्गी लागतात तेव्हा त्यांच्या आई वडिलांसाठी एक प्रकारचे जिंकणेच असते. काहीसा असाच प्रकार लखनऊ मध्ये घडलेला आहे. IPS अनुप कुमार जनार्दन सिंह यांनी ज्या वेळी लखनऊ एस.पी म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी विभुतिखंड पोलीस स्टेशनला भेट दिली. या भेटी दरम्यान त्या ठिकाणी असणारे पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन सिंह यांच्यासाठी तो क्षण खूप अविस्मरणीय आणि त्यांची छाती गर्वाने फुलून येणारा होता. आणि नसणार तरी का, ज्या मुलाला त्यांनी आपली पोलीसाची व्यस्त नोकरी सांभाळून उच्च शिक्षण देऊन IPS केले तोच मुलगा IPS अनुपकुमार सिंह हे त्यांचे पोलीस ठाण्यास भेट देण्यास आलेला होता. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन सिंह हे खूप खुश झाले होते. त्यांना त्यांच्या भावना सांभाळताना खूप कठीण जात होते. तरीही त्यांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवून सांगितले की, या वेळी माझा मुलगा हा प्रथम माझा अधिकारी आहे, त्यानंतर तो  माझा मुलगा आहे. मी माझ्या मुलास सॅल्यूट करेल. जसे की मी आजपर्यंत माझ्या प्रत्येक अधिकाऱ्यास सॅल्यूट करीत आलो आहे. मी त्याच्या आदेशाचे पालन करेल.

अनुप कुमार सिंह 2014 बॅचचे IPS अधिकारी असून, त्यांनी सांगितले की माझे वडील हेच माझे प्रेरणास्थान असून, माझा दिवस हा त्यांच्या चरणांचे आशीर्वाद घेऊन सुरू होतो. त्यांनी मला कधीही अभ्यासापासून किंवा खेळांपासून लांब रहा असे सांगितले नाही. तर त्यांनी मला शिकवले की तुला कोणत्याही गोष्टीत आवड असेल ती गोष्ट मनापासून करत रहा, नक्कीच तुला यश मिळेल. माझ्या वडिलांमुळेच मी या ध्येयापर्यंत पोहोचलो आहे.

यावेळी आई कांचन यांनी सांगितले की, आम्ही सर्व घरी असताना आमच्यात कोणीही आय पी एस, एस पी किंवा कॉन्स्टेबल नसतो. आमच्याकडे एकच जेवण करायचा टेबल असून आम्ही सर्व मिळवून त्याठिकाणी सामान्य कुटुंबासारखे जेवण करतो.

खरंच IPS अनुप कुमार सिंह यांच्या आई वडिलांसाठी खूप गर्वाचा क्षण नाही की, त्यांच्या मुलाने त्यांचे स्वप्न साकार करून ते सत्यात उतरवले आहे.