ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक

- Advertisement -

रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारखे उत्कृष्ट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती ढासळली असून त्यांना मुंबईतील जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्या यांना दोन-तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सध्या आयसीयु (इन्टेसिव्ह केअर युनिट) मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. विद्या यांना रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले, तेव्हापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत काहीशा सुधारणा असल्याच्या दिसून आल्या होत्या. मात्र अद्याप त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हेंटिलेटर काढल्यानंतर त्यांना श्वासोच्छवास करायला त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -