Home बातम्या राजकारण ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा

ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते  राहुल गांधी यांनी खरमरीत पत्र लिहून पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसमध्येराजीनाम्यांची मालिका सुरू झाली आहे. आज मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोडून काही वेळ उलटण्यापूर्वीच युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.  ”लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य करून त्याची जबाबदारी मी स्वीकारत असून, मी माझ्याकडे असलेल्या पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करत आहे. माझ्याकडे हा पदभार सोपवून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,” असे शिंदे यांनी राजीनामा देताना सांगितले.