Home मनोरंजन ज्योतिष : वास्तुशास्त्रानुसार केवळ घरच नाही तर नशिब देखील चमकते रंगाच्या योग्य वापरामुळे

ज्योतिष : वास्तुशास्त्रानुसार केवळ घरच नाही तर नशिब देखील चमकते रंगाच्या योग्य वापरामुळे

 घराच्या सजावटीमध्ये आपण रंगांच्या निवडीला प्राधान्य देतो. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास घरातील रंगांचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या आसपास असणाऱ्या रंगांचा व्यक्तीवर शारिरिक आणि मानसिक स्वरूपाचा मोठा प्रभाव पडत असतो. सत्व, रज आणि तामसिक या तिन्ही प्रकारच्या गुणांशी रंगांचा जवळचा संबंध असतो. आकाशी, हिरवा, पांढरा आणि इतर हलक्या रंगांना सत्वगुणी मानले जाते. तर लाल, नारंगी आणि गुलाबी रंग राजसिक गुणाचे समजले जातात ज्यामुळे इच्छा-आकांक्षांमध्ये वाढ होते.

कोणत्या रंगाचा कुठे वापर करावा –

हलक्या निळ्या आणि हिरव्या रंगाला वास्तूमध्ये आरोग्याचा प्राकृतिक स्रोत म्हणून पाहिले जाते. हे रंग थंड आणि कोमल प्रकारचे असतात आणि यांमुळे संयम आणि शांत स्वरूपाची कंपने निर्माण होतात. या रंगांचा उपयोग घराच्या ड्रॉईंग रूम मध्ये करणे योग्य ठरेल. बाथरूम चा रंग हलका निळा असणे वास्तूमध्ये शुभ मानले जाते.

या रंगांचा वापर घरात का करु नये –

गडद प्रकारचे रंग तामसिक स्वरूपाचे असतात. यांमध्ये गडद निळा, भुरका किंवा काळा रंग प्रमुख मानले जातात. घराच्या सजावटीत या रंगांचा वापर कमी आणि काळजीपूर्वक करावा. कारण हे रंग व्यक्तीला सुस्त आणि आळशी बनवतात. घरात सौहार्दयाचे वातावरण राहावे यासाठी नम्र, हलक्या आणि सात्विक रंगांचा वापर करावा.

स्वास्थ्यासाठी ‘हा’ रंग शुभ असतो –