Home अवर्गीकृत झारखंड विधानसभा निवडणूक जाहीर

झारखंड विधानसभा निवडणूक जाहीर

0

नवी दिल्ली : 2019 हे वर्ष राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे. देशासाठीची अत्यंत महत्वाची लोकसभा निवडणूक याच वर्षी पार पडली. तर काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही याच वर्षी पार पडत आहेत.

आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या काळात मतदान पार पडेल. तर 23 डिसेंबरला मतमोजणी होईल.

झारखंडमधल्या विधानसभेच्या 81 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान पार पडेल. 30 नोव्हेंबर, 7 डिसेंबर, 12 डिसेंबर, 16 डिसेंबर आणि 20 डिसेंबर या दिवशी झारखंड विधानसभेसाठीचं मतदान पार पडेल. आणि 23 डिसेंबरला निकाल लागेल.

लोकसभेला भाजपला बहुुमत मिळालं. मात्र महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठताना भाजपची दमछाक झाली. हरयाणात जेजेपी आणि काही अपक्ष आमदारांच्या साथीने भाजपने कसंबसं सरकार स्थापन केलं. मात्र महाराष्ट्रातलं सत्तेचं गणित अद्याप भाजपला जुळवता आलेलं नाही. त्यामुळे आता झारखंडमधली जनता कुणाच्या पारड्यात मत रूपी आशिर्वाद टाकते हे बघणं औत्सुक्याचं आहे.