टिकटॉक विडीओ बनबण्यासाठी माकडउड्या मारणारा अटकेत

- Advertisement -

पुणे : परवेज शेख टिकटॉक विडीओ बनबण्यासाठी माकडउड्या मारणारा अटकेत. मुंबई:सोशल मिडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी सध्याची तरुणाई टिकटाँक अँपवर आपले नवनवीन व्हिडिओ टाकत असते. हे व्हिडिओ करताना अनेक जण आपला जिव धोक्यात घालतात. मुंबईच्या एका तरुणाला ही टिक टाँकचा व्हिडिओ चांगलाच अंगलट आला आहे. टिकटाँकवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लोकलमध्ये जीवघेणा स्टंट केल्या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तर या मुलाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकातून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या दारात जीवघेण्या पद्धतीने स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ रेल्वे पोलिसांच्या हाथी लागल्यानंतर पोलिसांनी त्या स्टंट करणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला. त्यावेळी हा तरुण हार्बर मार्गे दररोज सकाळी ९ च्या लोकलने सीएसटीला जात असल्याचे तपासात पुढे आल्यानंतर वडाळा रेल्वे पोलिसांनी टिळकनगर स्थानकावर या तरुणाला अटक केली. फैजान इस्माईल शेख असे या तरुणाचे नाव आहे.

‘टिकटॉक’साठी त्याने हा स्टंट केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. अशा प्रकारे स्टंट करणाऱ्यांवर रेल्वेने आता कारवाईचा बडघा उगारला आहे. चालू वर्षात पोलिसांनी दरवाज्यावर स्टंट करणे, गाडीच्या छतावर प्रवास करणे अशा एकूण ३७४ जणांवर पोलिसांनी रेल्वे कायदा १५६ अंतर्गत ३७२ संबंधित गुन्हे नोंदवून प्रवाशाला अटक केली आहे. या प्रवाशांकडून १,३८,२५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -