टीम इंडियासाठी धोनीचं ठरू शकतो तारणहार; प्रत्येक स्थानावर शतक झळकावणारा एकमेव भारतीय

- Advertisement -

मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रिषभ पंतला दुखापत झाली. त्यामुळे पंतला दुखापतीमुळे जर दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले तर त्याच्याजागी कोणाला संधी द्यायची, हा विचार भारतीय संघाला करावा लागेल. पण यावेळी भारतीय संघासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तारणहार ठरू शकतो. कारण धोनी हा भारताचा एकमेव खेळाडू आहे की ज्याने प्रत्येक स्थानावर खेळताना शतक झळकावले आहे.

Related image

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हीड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Related image

इंग्लंडमधील विश्वचषकानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण जानेवारीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणार आहोत, असे धोनीने म्हटले होते. त्यामुळे ही धोनीसाठी चांगली संधी असेल, असे म्हटले जात आहे.

Related image

आतापर्यंत धोनीने ३ ते ७ या स्थानावंर फलंदाजी केली आहे. या सर्व स्थानांवर खेळताना धोनीने शतकं झळकावली आहेत. तिसऱ्या स्थानावर खेळताना धोनीने नाबाद १८३ धावांची खेळी साकारली होती. हीच धोनीी सर्वोत्तम धावसंख्या आहे. चौथ्या क्रमांकावर खेळताना धोनीने नाबाद १०९ धावांची खेळी साकारलेली आहे. पाचव्या स्थानावर खेळताना धोनीने १३४ धावा केल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर खेळताना धोनीने नाबाद १३९ धावांची खेळी साकारली होती. धोनीने सातव्या क्रमांकावर खेळताना नाबाद १३९ धावा केल्या होत्या. त्यामुळे धोनी कोणत्याही स्थानावर खेळण्यास फिट दिसत असून आता त्याला संधी कधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.

Image result for ms dhoni BATTING
- Advertisement -