Home गुन्हा ट्रक चालकास मारहाण करुन दारुचा ट्रक पळवून नेणा-या टोळीतील व मोकामधील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट – ३ कडून जेरबंद

ट्रक चालकास मारहाण करुन दारुचा ट्रक पळवून नेणा-या टोळीतील व मोकामधील फरार आरोपी गुन्हे शाखा युनिट – ३ कडून जेरबंद

पुणे: परवेज शेख पुणे, दि. २५ जुलै – गुन्हे शाखा गुनिट – ३ चे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस अभिलेखावरील फरारी व पाहीजे आरोपींचा शोध घेत असताना दिनांक-२५/०७/२०१९ रोजी सपौफ अनिल शिंदे व पोहवा प्रविण तापकीर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहीती मिळाली की, सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्हयातील फरारी आरोपी निलेश ऊर्फ काळया भगत हा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतो, तो शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात येणार आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन पोलीसांनी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पुणे समोर सापळा लावुन संशयीत निलेश ऊर्फ काळया ग्यानबा भगत वय- २८ यास ताब्यात घेतले, तो सुमारे एक वर्षापासुन गुन्हयामध्ये फरार होता व सापडत नव्हता, आरोपी नाव बदलुन रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करत होता. त्यास पुढील कारवाईसाठी सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुकेश अशोककुमार गुप्ता हे त्यांचा ट्रक घेवुन जात असताना दि-२२/०५/२०१८ रोजी मौजे-खळद ता-पुरंदर जि-पुणे या रोडवर मोटार सायकलवरुन आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांच्या ट्रकला मोटारसायकल आडव्या घालुन ट्रक थांबवुन त्यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण ट्रक वाकड ताथवडे येथे नेवुन ट्रकमधील इंम्पेरियल ब्ल्यु कंपनीच्या दारुच्या बाटल्याचे ९२४ बॉक्स, दोन मोबाईल फोन, रोख रुपये ६,000/- असा एकूण रुपये ५५,३३,०१४/- चा माल जबरदस्तीने दरोडा टाकुन नेला होता. त्याबाबत सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल आहे, सदर गुन्हयामध्ये यापुर्वी सासवड पोलीस स्टेशन पुणे येथील पोलीसांनी १) पप्पू ऊर्फ प्रकाश गायकवाड २) दत्ता गायकवाड रा. बहुली पुणे ३) अनिल भगत रा. भगत वाडी बहुली ता-हवेली.