सोशल मीडियावर गायत्री दातारला ट्रोल करण्यापूर्वी १० वेळा करा विचार, कारण…
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली, ‘तुम्ही बघताय की, बंगालमधून खूप हादरवून टाकणाऱ्या बातम्या येतायत. गँगरेप होतायत, घरांना आग लावली जातेय. पण कुणीही काहीही बोलायला तयार नाहीये. कोणतीही इंटरनॅशनल मीडिया या घटनांना दाखवत नाहीये. मला कळत नाहीये भारताविरोधात हा कोणता कट रचला जातोय? आपण देशद्रोहींना इतके का घाबरतोय? हिंदूंचं रक्त इतकं स्वस्त झालंय का? मला माहितीये आपल्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. आपण खूप वाईट पद्धतीने फसलोय. आता देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. जवाहरलाल नेहरूंनी १२ वेळा, इंदिरा गांधींनी ५० वेळा आणि मनमोहन सिंग यांनी १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली होती. मग आपण कुणाला घाबरतोय? कित्येक निष्पापांची हत्या होतेय आणि आपण फक्त आंदोलन करत बसायचं आहे का? मी सरकारला विनंती करते की, काहीतरी कठोर पाऊल उचललं जावं.’ असं कंगनाने तिच्या व्हिडीओत म्हटलं.
कंगनाने ममता बॅनर्जी यांची तुलना ताडका राक्षसी सोबत केली होती. त्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली. ती म्हणाली, ‘मी चुकीची होते. त्या रावण नाहीत. रावण तर महान राजा होता, त्याने दुनियेतील सगळ्यात जास्त श्रीमंत देश बनवला होता. तो एक महान राजा होता, विद्वान होता, वीणा वाजवणारा परिपूर्ण राजा होता. पण ही तर रक्तासाठी आसुसलेली ताडका राक्षसी आहे. ज्या लोकांनी त्यांना मत दिली त्यांचे हात देखील रक्ताने माखलेले आहेत.’