Home बातम्या आंतरराष्ट्रीय ठरलं..! क्रिकेटच्या मैदानावर हिंदुस्थान-पाकिस्तान पुन्हा भिडणार, ‘या’ तारखेला सामना

ठरलं..! क्रिकेटच्या मैदानावर हिंदुस्थान-पाकिस्तान पुन्हा भिडणार, ‘या’ तारखेला सामना

0

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशातील क्रिकेट सामना म्हणजे क्रीडा प्रेमींना पर्वणीच. दोन कट्टर प्रतिस्पर्धीमधील मैदानावरील द्वंद्व पाहण्यासाठी अवघे जग आतुर असते. नुकताच इंग्लंडमध्ये झालेल्या एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत 16 जून रोजी दोन्ही संघ भिडले होते. या लढतीत नेहमीप्रमाणे हिंदुस्थानने बाजी मारली. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांचे क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहे. मात्र हा सामना सिनियर नाही तर ज्युनियर संघात खेळला जाणार आहे.

गुरुवार 4 सप्टेंबरपासून श्रीलंकेत अंडर-19 आशिया कप सुरू होणार आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान ‘ग्रुप-ए’मध्ये आहेत. या स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये 7 सप्टेंबरला शनिवारी कोलंबोमध्ये सामना रंगणार आहे.हा सामना ज्युनियर संघात असला तरी दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघातील सामना पाहण्यास क्रीडा प्रेमी उत्सुक आहेत.