हायलाइट्स:
- ‘दृश्यम’ च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘दृश्यम २’
- पॅनोरोमा स्टुडिओने खरेदी केले चित्रपटाचे हिंदी राइट
- चित्रपटातील कलाकारांची नावं अजूनही गुलदस्त्यात
‘ती रक्त पिणारी ताडका,’ कंगनाने साधला ममता बॅनर्जींवर निशाणा
मल्याळम भाषेतील ‘दृश्यम २’ ने यापूर्वीच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. प्रेक्षकांना एकाच जागी खिळवून ठेवण्याची ताकद असलेली कथा असणाऱ्या ‘दृश्यम २’ चित्रपटाचे हिंदी राईट पॅनोरोमा स्टुडिओ इंटरनॅशनलचे कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी खरेदी केले आहेत. लवकरच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती ट्विटरवर दिली आहे. मल्याळम ‘दृश्यम २’ चे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी म्हटलं की, ‘आम्हाला खूप आनंद आहे या चित्रपटाची कथा आणखी प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’
‘दृश्यम’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाने अजयने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. प्रेक्षकही चित्रपटाच्या प्रेमात पडले होते. यावेळेस ‘दृश्यम २’ मधील कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, या चित्रपटात अजय आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. ‘दृश्यम’ नंतर ‘दृश्यम २’ पाहायला मिळणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. परंतु, आता त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून प्रेक्षक ‘दृश्यम २’ ला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं औसुक्याचं ठरेल.