मुंबई : चार महिन्यांपूर्वी सुरू झालेलं ‘अग्गंबाई सासूबाई‘ या मालिकेचं नवं पर्व ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेच्या रुपात बघायला मिळालं. पहिल्या पर्वात सासूच्या पाठीशी सून आणि आता दुसऱ्या पर्वात सूनेच्या पाठीशी सासू असं चित्र दिसून आलं.
मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मालिका संपवण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं कळतं. या महिन्याच्या अखेरीस मालिकेचं चित्रीकरण पूर्ण होईल. तर ऑगस्टमध्ये मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचं समजतं. त्यामुळे आता काहीच भाग राहिले असल्यानं मालिका वेगानं पुढे सरकेल यात शंका नाही.
देवमाणूस मालिकेतही ट्विस्ट
देवमाणूस मालिकाही बंद होणार असल्याच्या चर्चा रंगत असल्या तरी मालिकेत सध्या वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
- Advertisement -