ठाणे, दि. 26 (जिमाका) : महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या ठाणे जिल्ह्यातील प्रगतीचा आज विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी आढावा घेतला. देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे असून या प्रकल्पांशी संबंधित भूसंपादन व इतर कार्यवाही संदर्भात प्राधान्यक्रम ठरवून त्या कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी श्री. पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, कोकण विभागाचे उपायुक्त (पुनर्वसन) पंकज देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक बाबासाहेब रेडेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रेवती गायकर, कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाघचौरे, उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी जयराम कारभारी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रोहित राजपूत, राष्ट्रीय हायस्पिड रेल्वे प्रकल्पाचे एस.के. पाटील, समर्पित मालवाहतूक मार्गिका प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव त्यागी यांच्यासह विविध प्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई अहमदाबाद अतिजलद रेल्वे (बुलेट ट्रेन), समर्पित मालवाहतूक मार्गिका (डीएफसीसीआयएल), मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग, कल्याण कसारा तिसरी रेल्वे मार्ग यासह विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची सद्यःस्थिती, भूसंपादनात येणाऱ्या अडचणी, निधीचे वाटप, प्रकल्पासाठीच्या जमिनीचा ताबा घेणे, प्रलंबि
श्री. पाटील म्हणाले की, देशाच्या दृष्टीने हे सर्व महत्त्वाचे प्रकल्प आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या कामांना महसूल यंत्रणेने प्राधान्य देऊन कामे पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करावा. भूसंपादन व त्यासंबंधीची कामे 20 मेपर्यंत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावे.
जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी प्रकल्पांच्या भूसंपादनाची सध्याची स्थिती व येणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली. भूसंपादनाच्या व इतर कामांमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगितले. विविध प्रकल्पांचे अधिकाऱ्यांनी यावेळी प्रकल्पात येणाऱ्या अडचणी सादर केल्या.