Home शहरे मुंबई ठाणे शहराला पावसाने झोडपले; अनेक भागात पाणी साचले तर रेल्वे सेवाही विस्कळीत

ठाणे शहराला पावसाने झोडपले; अनेक भागात पाणी साचले तर रेल्वे सेवाही विस्कळीत

0

ठाणे : सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाने ठाण्यात पुन्हा आपली हजेरी लावली आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरण झाले असून वाहने देखील धीम्यागतीने धावत आहे. तर ठाण्याच्या वंदना बस स्टॉप वर आणि काही सखोल भागात पाणी साचले चित्र दिसून येत आहे. गेल्या तासाभरात 26 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण दिवसभरात अडीचशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे.

सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झालेला आहे ,तसेच मध्य रेल्वे सेवादेखील विस्कळीत झालेली आहे ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाले आहेत रेल्वे पटरी वरती पाणी साचल्यामुळे ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धावत आहे पावसाचा जोर कायम राहिला तर नक्कीच अनेक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे.  मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प झालेल्या आहेत. गेल्या अडीच ते तीन तासापासून फलाट क्रमांक चार वरती लोकल ट्रेन उभी आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांना बसला आहे ,तर पाहू शकतात महिला डब्यात गेल्या अडीच-तीन तासापासून महिला जागीच बसूनच आहे. रेल्वे कडुन सूचना जरी दिले असले तरी उपायोजना काहीच नसल्याचं रेल्वे प्रवाशी महिला सांगत आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ठाणे स्थानकातच उभे आहेत. तर मुंबईवरून काही प्रमाणातच गाड्या कल्याणच्या दिशेने येत आहे .जस जसा पाण्याचा निचरा होईल त्यानंतरच रेल्वेसेवा सुरळीत होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पुन्हा आज देखील रेल्वेचा फटका रेल्वे प्रवाशांना बसलेला आहे. कळवा ते मुंब्रा जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे. दोन ते तीन फूट पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर ठिकाणी पोलीस या रस्त्याने न जाण्यासाठी मज्जाव घालत आहे रस्त्यालगत नाला असल्याकारणाने नाल्याचे पाणी स्त्यावर आले आहे, त्यामुळे आजूबाजूचा इमारतीत देखील हेच पाणी शिरल्यामुळे इमारतीतील राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला आहे .