Home ताज्या बातम्या ठाण्यात अखेर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात,विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता खैर नाही

ठाण्यात अखेर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात,विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता खैर नाही

ठाणे | ठाण्यात अखेर रॅपिड एक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. ठाण्यातील मुंब्रा येथे या रॅपिड एक्शनच्या जवानांनी रुट मार्च काढला असुन आता मुंब्रा शहरात विनाकारण बाहेर फिरणा-यांची खैर नाही हाच संदेश या रुट मार्च च्या माध्यमातातून रॅपिड एक्शन फोर्सच्या जवानांनी दिला आहे. या फोर्समध्ये 3 अधिकारी आणि 50 जवानांचा हा ताफा आहे. मुंब्रा येथील नागरिकांना वारंवार सांगून देखील नागरीक लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी तुडवतायेत. यामुळे आता मुंब्रा मध्ये थेट रॅपिड एक्शन फोर्सलाच पाचारण करण्यात आल आहे.

मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी या ताफ्याचे नेतृत्व केले असून याआधी विविध प्रकारे मुंब्रातील नागरीकांना मुंब्रा पोलिसांनी घरातच राहण्याची विनंती केली होती. मात्र तरीही नागरीक विनाकारण बाहेर फिरतच होते. याचाच परिणाम म्हणुन मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले होते तर संपुर्ण मुंब्रा शहरात तब्बल 312 नागरिक कोरोनाबाधित आढळलेत तरीही मुंब्रातील परिस्थिती काही बदलत नव्हती यामुळे आता रॅपिड एक्शन फोर्सच्या जवानांना मुंब्र्यात पाचारण करण्यात आलं आहे.