Home बातम्या व्यवसाय ठाण्यात आणखी परिपूर्ण टाऊनशिप येत आहे

ठाण्यात आणखी परिपूर्ण टाऊनशिप येत आहे

0
प्रतिनिधी : ठाण्यात घरे घेण्याच्या दृष्टीने वाढत चाललेल्या मागणीमुळे देशातील अग्रगण्य कल्पतरू बिल्डरतर्फे ठाण्यात कोलशेत येथे १०० एकरवर कल्पतरू पार्कसिटी नावाने नवीन टाऊनशिप वसवण्यात येत आहे. एकाच ठिकाणी ग्राहकांना घर, २० एकरवरील ग्रॅन्ड सेंट्रल पार्क, उद्यान, जीम, कमर्शिअल जागा, रिटेल शॉप, मॉल, आयसीएसई शाळा आदी सगळ्या सुविधा या टाऊनशिपमध्ये असणार आहेत.घराच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी या टाऊनशिपमध्ये १,२,३ व ४ बेडची घरे उपलब्ध असणार आहेत.  संपूर्ण टाऊशिपमध्ये १० दशलक्ष चौरस फुटांचे बांधकाम होणार आहे. मात्र तरीही इथली हिरवळ, झाडे मात्र कायम ठेऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. ठाण्यात कोलशेत येथे २० एकर जागेवर प्रशस्त सेंट्रल पार्क उभारण्याचे काम कल्पतरू डेव्हलपर्सतर्फे याच ठिकाणी करण्यात येत आहे. हे पार्क म्हणजे  ठाण्याचे नवीन आकर्षण ठरणार आहे. न्यूर्याकच्या सेंट्रल पार्कच्या तसेच शिकागो येथील मिलिनीयम पार्कच्या धर्तीवर ठाण्याचे सेंट्रल पार्क असणार आहे. या सेंट्रल पार्कच्या सभोवताली ही टाऊनशिप बसवली जाणार आहे. हजारो झाडे नैसर्गीक स्थितीत येथे असणार आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात मुलांबरोबर किडस एरियामध्ये तुम्हाला येथे खेळता येईल. मॉर्निग, इव्हनिंग वॉक घेऊ शकतो. टेनिस, फुटबॉल, क्रिकेट सारख्या मैदानी खेळाचा आनंद येथे लुटता येऊ शकणार आहे. पोहण्याचा तलाव येथे असणार आहे. यासोबत टाऊनशिपमध्येच शाळा, रिटेल शॉपचे मॉल. देऊळ आदी देखील असणार आहे.टाऊनशिपमध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी वेगळी अशी ६ स्तरांची सुरक्षा व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. इलेक्ट्रीक वाहने चार्ज करण्यासाठी पार्कींग जागेत चार्जिंगची देखील सोय देण्यात आली आहे. कल्पतरू पार्कसिटी शहरात कोलशेत रोडवर असून कापुरबावडी नाक्याहून थेट पार्कसिटीला जाता येऊ शकते. कोलशेत येथून नवी मुंबई, मुंबई जलवाहतूक सुरू करण्याचा शासनाचा निर्णय आहे. त्याचाही फायदा येथे राहत असलेल्याना होऊ शकतो. आगामी ठाणे व  कल्याण मेट्रो देखील टाऊनशिपवजवळून जाणार आहे. पार्कसिटीतून नागरिकांना लगेच हायवेला येता येऊ शकते. भविष्याचा विचार करून शहरात ही टाऊनशिप उभी राहत आहे. ठाण्यात उभ्या राहत असलेल्या टाऊनशिपमुळे घराचे स्वप्न पाहत असलेल्यांसाठी एक चांगला अफोर्डीबल पर्याय उपलब्ध झाला आहे. ठाण्यात याआधी हिरानंदानी, रूस्तमजी यांच्या टाऊनशिप सुरू आहेत.