Home मनोरंजन ‘डर्टी पिक्चर’ सोडण्यावर कंगना म्हणते- ‘मी विद्या बालनपेक्षा उत्तम…’

‘डर्टी पिक्चर’ सोडण्यावर कंगना म्हणते- ‘मी विद्या बालनपेक्षा उत्तम…’

0
‘डर्टी पिक्चर’ सोडण्यावर कंगना म्हणते- ‘मी विद्या बालनपेक्षा उत्तम…’

[ad_1]

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनला ‘द डर्टी पिक्चर‘ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात तिनं सिल्क स्मिता या अडल्ट स्टारची भूमिका साकारली होती. पण या चित्रपटासाठी विद्या बालन ही दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती. या चित्रपटासाठी सर्वात आधी कंगना रणौतला विचारण्यात आलं होतं पण तिनं या चित्रपटासाठी नकार दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं याविषयी खुलासा केला. कंगनाचं म्हणणं आहे की, ती विद्या बालनपेक्षा उत्तम अभिनय करू शकली नसती. तिनं या चित्रपटात सर्वोत्तम अभिनय केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाला एखादा चित्रपट सोडल्याचा पश्चाताप होतो का असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली, ‘नाही, पण मला वाटतं ‘डर्टी पिक्चर’ तो चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा तो उत्कृष्ट होता. पण मला नाही वाटत की, मी विद्या बालनपेक्षा उत्तम अभिनय करू शकले असते. कारण ती खूपच उत्कृष्ट अभिनय केला आहे. पण हो मला कधी कधी वाटतं की मी त्या चित्रपटात पोटेन्शिअल नाही पाहिलं.’


कंगना पुढे म्हणाली, ‘मी मुख्य भूमिका साकारू शकणारी अभिनेत्री फक्त सहकलाकार आणि ऑफ-बीट चित्रपटांमधूनच झाले आहे. मी कधीच राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी किंवा धर्मा प्रॉडक्शन, यशराज फिल्म किंवा कोणत्याही खान अभिनेत्यांचे चित्रपट केलेले नाहीत. पण तरीही मी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलं. मला डर्टी पिक्चर हिट होईल असं वाटलं नाही पण तो न केल्याचा पश्चाताप मला होत नाही.’


कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा आगामी चित्रपट ‘थलायवी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगनानं तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जे जयललिता यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय यानी केलं असून या चित्रपटात अरविंद स्वामी, नासर आणि भाग्यश्री यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. करोना व्हायरसमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून नव्या रिलीज डेटची घोषणा अद्याप झालेली नाही. याशिवाय कंगना ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



[ad_2]

Source link